top of page
Search

चरणासी येऊनिया करितो वंदना आरती गुणवंत बाबा

  • Writer: Rahul Malviya
    Rahul Malviya
  • Jan 18, 2021
  • 1 min read

चरणासी येऊनिया करितो वंदना!

आरती गातो सुलाई नंदना!

लावणी ज्योती अपू र्णी मला कपूर ज्योतीच्या ज्वाला!

गुरु गुणवंता महान संता भक्तजनांच्या महाराजा!

संपतरावा तनया करिता वंदना !!१!! आरती गातो....

उद्धाराया भक्तजनांना अवतरला दीनानाथा!

आरती गाता व तव गुरुनाथा चरणी ठेविता माथा!

आशिष दे तूच मला गाया तव कवणा !!२!! आरती गातो....

त व मुखातूनी अमृतवाणी भक्तांना वरदान असे !

वेळोवेळी लिखाण करशील ब्रह्म ज्ञानाच्या सरसे !

कृपा करी दयाघना उघड कमल नयना !!३!! आरती गातो....

धरती अंबर विश्वचि सारे गुणवंता ची शान असे!

लेखणी मधूनी रौराडे च्यां गुणवंता चे निसान असे!

क्षणोक्षणी दर्शन तुझे घडू दे त्रिनयना!!४!! आरती गातो...



 
 
 

Recent Posts

See All
चला आरती करू या हो गुणवंत बाबांची

गुणवंत गुणवंत जय बोलाजय ! बोला गुणवंत जय बोला! चला आरती करूया हो ! गुणवंत बाबाची! गुणवंत गुणवंत जय बोला! जय बोला गुणवंत जय बोला! गुणवंत...

 
 
 

Comments


bottom of page